"...म्हणून रोज गोंधळ तयार करून तणाव निर्माण केला जातोय", शरद बाविस्करांचा गंभीर आरोप

  • last year
महाराष्ट्रात सध्या महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पारा चढला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) फ्रेंच साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. "रोजगार, महागाई, आरोग्य, शिक्षण या मुलभूत प्रश्नांवर रोज चर्चा व्हायला लागली, तर अवघड जाईल. म्हणून रोज काहीतरी गोंधळ तयार करून तणाव निर्माण केला जात आहे," असा आरोप शरद बाविस्कर यांनी केला. ते शुक्रवारी (२३ डिसेंबर) धुळ्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.