सरिस्का व्याघ्र प्रकल्पात भीषण वणवा, आग विझण्यासाठी वायू दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर

  • 2 years ago
राजस्थानमधील प्रसिद्ध सरिस्का व्याघ्र प्रकल्पात भीषण वणवा लागला आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे १० चौरस किलोमीटर भागात ही आग पसरली आहे. आग विझवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु असून यामध्ये भारतीय वायू दलाचीही मदत घेण्यात आली आहे. वायू दलाच्या हेलिकॉप्टपमधून पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबद्द्ल एक व्हिडिओ भारतीय वायू दलाने प्रसिद्ध केला आहे.

Recommended