वाहतूककोंडीत अडकलेल्या शरद पवारांच्या ताफ्याला वेगळी लेन करून वाट देण्यात आली.

  • last year
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वीकएंडची सुट्टी असल्याने पर्यटक मुंबईहून फिरायला निघाले आहेत. याच कारणामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारदेखील अडकले होते. मात्र पोलिसांनी अन्य लेनद्वारे शरद पवार यांना जाण्यासाठी वाट करून दिली.

Recommended