पणजी येथील कला अकादमीमध्ये किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा वरील सुनावणीसाठी आज उत्तर गोव्यातून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या जाहिरातीमध्ये लोकांना जे सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे सूचना केल्यानंतर आज नोंदणी केलेल्या लोकांना सुनावणीस आतमध्ये सोडण्यात आले नाही त्यामुळे अनेकांनी त्यांचा विरोध केला आहे. या सुनावणीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Category
🗞
News