पणजी: मेजेस्टिक प्राईड तर्फे कांपाल येथील क्रीडा प्रधिकरण खात्याच्या बहुउपयोगी सभागृहात स्टेप अप कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्टेप अप कोविड उपचार केंद्रात डॉ.मिहिर चोधरी व उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी डाक्टर्स व नर्सीसशी चर्चा केली. मेजेस्टिक प्राईडच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६० खाटांचे हे कोविड उपचार केंद्र आहे. सर्व खाटा प्राणवायू युक्त व इतर सर्व सोविधायुक्त आहेत. हे केंद्र आज ता. २० मे पासून सुरु होत आहे. या स्टेप अप कोविड उपचार केंद्रात दाखल होण्यासाठी ७५०७७७५००३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या मान्यतेनुसार हे उपचार केंद्र कोरोना रुग्णांना दाखल करुन घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे उपचार करणार आहे.
व्हिडिओ: संदीप देसाई
व्हिडिओ: संदीप देसाई
Category
🗞
News