आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कासारवर्णे येथे डोंगरावरुन गेलेला तिळारीचा पाट फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटाचे सगळे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला पुराचे स्वरुप आले होते. यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. काही ट्रकनी या अशा पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला त्यातील काही ट्रक पाण्याबरोबर आलेल्या चिखल व मातीमुळे मध्येच रुतले. कालव्याचे पाणी बंद करण्यात आले तरी कालव्यात असलेल्या पाण्याचा प्रवाह सुरुच होता.
Category
🗞
News