• 4 years ago
कोरोनाविरूद्धच्या लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची घटना घडली आहे. सीरम इन्स्टीट्यूटच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून, या घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रतील 2 गाड्या तसेच कोंढवा व हडपसर केंद्राच्या 2 अशा चार गाड्या घटनास्थली रवाना झाल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 10 गाड्या व एक ब्रांटो व्हेईकल अशा एकूण 11 अग्निशमन गाड्या गेल्या आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

Category

🗞
News

Recommended