सत्तरीतील मेळावलीवासीयांनी एक व्हिडीओ जारी केलाय. या व्हिडीओतून मेळावलीतील ग्रामस्थांनी राज्यातील समस्त जनतेला मदतीची याचना केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे पोलिस मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थिती मेळावलीतील ग्रामस्थांना अटक करण्यात येणार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. इतकंच नाही तर त्यासाठी साडेपाचशे पोलिसही अटकेची कारवाई करण्यासाठी येणार असल्याचं जारी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय.
गोव्यातील भाऊबहिणींना साद
गोव्यातील भाऊ बहिणींनी आमची मदत करावी, आणि आमच्या सोबत राहून आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी आर्त साद मेळावलीतील ग्रामस्थांनी घातली आहे. मेळावलीतील काही तरुण आणि ग्रामस्थ या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. गावातील देवतेला नमस्कार करुन त्यांनी आपला संदेश व्हिडीओच्या स्वरुपात जारी केलाय.

Category
🗞
News