Surekha Punekar on Koshyari:'राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे'; सुरेखा पुणेकरांची मागणी

  • 2 years ago
पुण्यातील पत्रकार परिषदेत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, 'भाजपमध्ये महिलांबद्दल कोणत्याही प्रकाराचा सन्मान राखला जात नाही.हे अनेक उदाहरणामधून स्पष्ट होत आहे.त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या आराध्य दैवताबद्दल जे विधान केले ते ऐकून फार वाईट वाटले. असे पुणेकर म्हणाल्या. त्याचबरोबर 'राज्यपालांची उचलबांगडी केली पाहिजे त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवलं पाहिजे' अशी मागणीही त्यांनी केली.