‘शिवाजी जुन्या काळातले आदर्श, मी नव्या…”, Bhagat Singh Koshyari यांचे वक्तव्य चर्चेत!

  • 2 years ago
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#nitingadkari #sharadpawar #bhagatsinghkoshiyari #bhartiyajantaparty #rashtravadicongress #chatrapatishivajimaharaj #aurangabad

Recommended