वि. म. साहित्य संमेलनात '५० खोके एकदम ओके'च्या वेशभूषेने वेधलं सर्वांचं लक्ष

  • last year
वि. म. साहित्य संमेलनात '५० खोके एकदम ओके'च्या वेशभूषेने वेधलं सर्वांचं लक्ष

राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून रोज अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. यामध्ये '५० खोके एकदम ओके' हा आरोप विरोधकांकडून कायम केला जातो. अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता. असं असतानाच आता १७व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. यावेळी विद्रोही साहित्य संमेलनामध्ये ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेशभूषा करीत महेंद्र मुनेश्वर यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
सध्या त्यांचा हा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे.

Recommended