दुसऱ्या लग्नाची गोष्ट! अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा

  • 2 years ago
आयुष्य जगायला कोणाची तरी साथ असेल तर ते आनंदाने जगता येत असं म्हणतात. नाशिकच्या सटाण्यामधील विजय खैरनार यांची कहाणी अशीच आहे. पत्नीचे २०११ साली निधन झाल्यावर मुलगा योगेंद्रसोबत ते रोजचा दिवस व्यतीत करायचे. मात्र करोना आला अन् मुलाचा त्यात मृत्यू झाला.. आणि विजय खैरनार एकटे पडले. पण मुलीने अन् जावयाने त्यांची फरफट थांबवण्यासाठी निर्णय घेतला त्यांचा विवाहाचा. त्यांच्या सारखीच कहाणी असलेल्या एका महिलेशी त्यांचा विवाह झाला आणि सुरू झाला नव्याने दोघांचा प्रवास! सटाण्यात हा विवाहसोहळा चर्चेचा विषय झालाय.