तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी कसली कंबर

  • 2 years ago
भाजपबरोबर बिनसल्यापासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सातत्याने भाजपच्या विरोधात भूमिका घेत असून प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांशी ते संपर्क साधत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचा भाग म्हणूनच चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईला भेट दिली. चंद्रशेखर राव यांनी मुंबईत येऊन आपले राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यात ते कितपत यशस्वी होतात हे कालांतराने स्पष्ट होईल.

Recommended