कल्याण-डोंबिवलीतील गुन्ह्यांचं सत्र थांबेना; लुटीच्या इराद्याने कापला एकाचा गळा

  • 3 years ago
डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात एक भयानक घटना घडली आहे. रात्री १च्या सुमारास रिक्षाने जाणाऱ्या दोन प्रवाशांवर हल्ला करण्यात आला असून त्यातील एकाच खून झाला आहे. लूट करण्याच्या इराद्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वाचलेल्या प्रवासाने दिलेल्या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिस आणि शहर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

#Kalyan #Dombivali #Crime #ThackerayGovernment