आलिशान गाडीतून शेतकरी विकतोय कलिंगडं

  • 3 years ago
लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे सिल्लोड येथील एक शेतकरी आपल्या आलिशान गाडीतून कलिंगडं विकतोय. बाजारपेठा बंद असल्याने कित्येकजणांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे.
या बिकट परिस्थितीमध्ये कलिंगडांची विक्री केवळ दहा रुपये प्रतिनग या दराने करण्यात येत आहे.
भाड्याचे वाहन करुन गावोगावी जाऊन कलिंगडांची विक्री करणे परवडत नसल्याने हा शेतकरी चक्क बारा लाख रुपये किंमतीच्या आलिशान गाडीतून कलिंगडांची विक्री करत आहे.