Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्यात एका नवविवाहित दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला... हरियाणाचे लेफ्टनंट विनय आणि हिमांशी यांचं अवघ्या सात दिवसांपूर्वी लग्न झालं होतं...डोळ्यांत स्वप्नं घेऊन हनीमूनसाठी ते काश्मीरला गेले होते...पण हिमांशी यांच्या समोरच दहशतवाद्यांनी विनय यांच्यावर गोळ्या झाडल्या...पाहुयात मन हेलावून टाकणारी ही दुर्दैवी कहाणी...

कोणत्याही संवेदनशील माणसाच्या काळजाला भेगा पाडणारा हा फोटो...

हा फोटो कालपासून ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओल्या झाल्या असतील...

या फोटोची तुलना दुसऱ्या महायुद्धातल्या त्या चिमुकल्याच्या फोटोशीच होऊ शकते...

...जो आपल्या छोट्या भावाचे अंतिम संस्कार करण्यासाठी त्याला पाठीशी बांधून स्तब्धपणे स्मशानभूमीत वाट पाहत उभा आहे...

किंवा जगभरातल्या लोकांचं हृदय पिळवटून टाकणाऱ्या दोन वर्षांच्या त्या आलन कुर्दीशी...

...जो २०१५ मध्ये दंगलग्रस्त सिरीयातून युरोपात आयुष्य सावरण्यासाठी निघालेल्या आईवडिलांसोबत जात असताना भूमध्य सागरातच त्याच्या आयुष्याचा प्रवास थांबला...

समुद्रकिनारी निपचित पहुडलेल्या त्याच्या फोटोनं जगभरातल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता...

पृथ्वीवरचं स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधल्या पहलगाममधला आताचा हा असाच मन सुन्न करणारा फोटो...

तिच्या हातावरच्या मेहंदीचा रंगही अजून उतरला नव्हता

गेल्याच आठवड्यात तिनं आपल्या जोडीदारासोबत साता जन्माच्या गाठी मारल्या होत्या...

आणि केवळ सातच दिवसांत त्याच जोडीदाराच्या पार्थिवाशेजारी बसून आकांत करण्याची वेळ तिच्यावर आली...

ज्या डोळ्यांनी नव्या आयुष्याची स्वप्नं बघितली, त्याच डोळ्यांमधले अश्रू आता थांबायला तयार नाहीत...

दोनच दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशी हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते...

मंगळवारी पहलगाममधल्या बैसरन खोऱ्यात ते फिरायला गेले...

आणि माणसाचा मुखवटा घालून आलेल्या सैतानांनी त्यांच्यावर घाला घातला...

हिमांशी हिच्या डोळ्यांसमोरच अतिरेक्यांनी विनय यांना घेरलं...

भेळपुरी खात असलेल्या विनयला अतिरेक्यांनी धर्म विचारला आणि निर्दयतेने गोळ्या घातल्या...


हरियाणातल्या कर्नालचे लेफ्टनंट विनय नरवाल तीन वर्षांपूर्वी नौदलात भरती झाले होते.
अवघ्या सात दिवसांपूर्वी त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग मसुरीत झालं होतं.
आठच दिवसांत म्हणजे एक मे रोजी विनय यांचा वाढदिवस होता.
३ मे रोजी ते कोचीमध्ये ड्युटीवर हजर होणार होते.

पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं...

आपल्या कर्तबगार मुलाच्या जाण्यानं नरवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय...

खरं तर विनय आणि हिमांशी हनिमूनसाठी युरोपला जाणार होते...

पण व्हिसा न मिळाल्यानं ऐनवेळी त्यांनी काश्मीरचा प्लॅन आखला...

आणि स्वप्नवत काश्मीरमध्ये जोडीदारासोबत नव्या संसाराची स्वप्नं रेखाटताना सगळंच विस्कटलं...

अवघ्या सात दिवसांत होत्याचं नव्हतं झालं...आयुष्याची राखरांगोळी झाली...

ही राखरांगोळी करणारे नराधम मोकाट आहेत...त्यांना कायमची अद्दल घडवणं

हीच लेफ्टनंट विनय यांना खरी श्रद्धांजली असेल...

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...

Category

🗞
News
Transcript
00:00अणि काश्मीर मदल्याय अतिरेकी हल्यात एका नवई विवाही दामपत्यावर दुखाचा डोंगर को सल्ला
00:04अर यानाचे लेफटन विनै अणि हिमांशी आंचा आउग्या साथ द्योसान पुर्विस लगना जाला होता
00:08अनिमुन सडीते काश्मीर लागेले होती पन हिमांशी आँचा समोरस दहश्यत्वाद्यानी विनै आँचा वर गोल्या जाडले है
00:14पाहुया हेलाउन टाकनारी इही दुरतैवी कहानी
00:38कोण त्याही सववेदनशील मानसाचा कालजाला भेगा पाटनारा हा फोटो
00:46हा फोटो कालपासुन जान्नी जान्नी पाहिला असेल तनचा डोल्यांचा कडा नक्किच ओल्या झाले आस्तिल
00:54या फोटोची तुलना दुसर्या महायु धातल्या त्या चिमुकलाचा फोटोशित्स होव शकते
01:00जो आपले छोट्या भावाचे अंतिम सांस्कार करना साथी त्याला पाठीशी बांधुन समशान भुमित वाट पहतु भावता
01:09किमा जग भरातल्या लोकांचा रिधाय पिलवटून टाकना र्या दोन वर्षांचा त्या आलन कुर्दीशी
01:20जो 2015 मधे दंगल गस्तर सीरियातुन युरोपात आयुष्य सावरने साथी निगालेले आईवडलां सोबत जातस्ताना भुमध्य सागरातस तेचा आयुष्याचा प्रवास थामला होता
01:34समुद्र किनारी निपचित पहुगलेले त्या फोटो न जग भरातल्या लोकांचा काजाचा ठोकाचु कवला
01:52प्रुथ्री वर्चा स्वर्ग समझले जानारे काश्मीर मतल्या पहलगाम मधिल अत्ताचा हासाच मन सुन्न करनारा फोटो
02:00तीचा हातावर्चा महिंदीचा रंगहिव जुनु तरला नवता
02:14गेलास आठोडयात तिना अपले जोडिदारा सोबद साथा जन्मान चा गाठी वांदल्या उत्या
02:20अणिकेवल सातच दिवसाथ त्याच जोडिदाराचा पार्थिवा शेजारी बसुन आकांत करनाची वेल अस्तिचा वराली
02:29जडोडयानी नवया आयुष्याची स्वपन पाहिली होती त्याच डोडयात अश्रूचा बांध अता थामबाईलात तयार नहीं
02:37दोनस दिवसान पुर्वी विनाय आणि हिमान्शी हनिमून साथी काश्मीर लागेले होते
02:52मंगलवारी पहलगाम मतल्या बैसरन खोर्यात ते फिराय लागेले
02:57आणि मानसाचा मुखवटा घालूना लेले सैतानानी तैंचा वर घाला घातला
03:02हिमान्शी हीचा डोलान समोरच अतिरेकैनी विनाय आना घेरला
03:07भेपुरी खातसलेला विनायला अतिरेकैनी धर्म विचारला आणि निर्दाय तेना गोड़या घतला
03:15हरियान अतले करनाल से लेफटनेंट विनै नर्वाल तीन वर्षान पुर्वीच नवदलाद भरती जाले होते
03:23अवग्या साथ तिवसान पुर्वी तैंसा डेस्टिनेशन वेडिंग मसुरीच जाले
03:28आठस दिवसाथ मंजे एक मेरोजी विनै यांसा वाड़ दिवस होता
03:45अबगार मुलाचा जानयान नर्वाल कुटुम्बियान वर दुखा सा डोंगर को सड़ाए
04:15यही अपील है अमारी तो परदान मंतरी जी सेवी केश को कुरवादो कीशी वी तरह सेवी सतम करें यही अपील
04:26खरतर विनै यानी हिमान्शी हनिमून सथी यूरोपला जानार होते
04:32पन वीजा न मिलाले न आईन वेडि तैनी काश्मिरचा पलानाखला
04:36आणी स्वपनवत काश्मिर मते जोडिदारा सोवत नव्या संवसाराची स्वपनरे काटताना सगलाच विस्कटून गेला
04:45आउग्या साथ दिवसाथ होतेच नवत जाला
04:48आयुश्याची राख रांगोली जली
04:51ही राख रांगोली करनारे नराधम आज मोकाटे
04:55तना कायमची अद्दल घड़वन हीच लेफटनेंट विनाईयाना खरीश रधान जलीया सेल
05:02ब्योरो रिपोर्ट एबीपी माज़ाग
05:05एबीपी माज़ाग उगडा डोले बगा नीट

Recommended