• last month
हिवाळ्याच्या सिजनमध्ये आपण बाजारात गेलो की, टोपल्यांमध्ये आणि ठेल्यावर एक काळया रंगाच्या सालीचे फळ हमखास दिसते. या फळाला मराठीत शिंगाडा तर इंग्रजीत वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असे म्हणतात. खरं तर शिंगाडा ही पाण्यातील एक भाजी आहे. पाण्यामध्ये उगवणारी ही फळभाजी कुरकुरीत आणि चवीला गोड लागते. शिंगाड्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. या शिंगाड्यामध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते. शिंगाडा हे असं फळ आहे जे खूप आवडीने खाल्लं जातं. हे फळ खाण्यास चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे फळ कच्चं किंवा उकडून खाल्लं जातं. हे फळ शरीराला अनेक गंभीर विकारांपासून वाचवते. शिंगाडा खाण्याने आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात ते समजून घेऊयात

#lokmatsakhi #singhada #winterfoods #health #healthtips

Recommended