अभिनेत्री सई ताम्हणकरचे सिनेमे आणि तिचं वैयक्तिक आयुष्य दोन्ही चर्चेत असतं. सईनं आता चाहत्यांना सरप्राइज देत धक्का दिला आहे. सईनं एक खास गोष्ट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलीये. सईनं एका खास व्यक्तीचा फोटो शेअर केलाय. तसंच 'दौलतराव सापडला', असं कॅप्शन देखील सईनं या फोटोला दिलंय. हा सईचा दौलतराव कोण आहे ते तर तुम्हांला सांगणार आहेच पण त्याआधी सई ताम्हणकर आता पर्यंत चर्चेत का आलीये ते जाणून घेऊया
सई ही मूळची सांगलीची. तिचं कॉलेजचं शिक्षण तिथेच झालं. सईनं सनई चौघडे चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि स्वतःचं एक स्थान तिने या इंडस्ट्रीत निर्माणं केलं. फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात काम करून तिनं आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं. आमिर खानच्या गजनी चित्रपटात सईनं काम केलं होतं. त्यानंतर सई चर्चेत आली ती पुण्यातील दारू पार्टी प्रकरणामुळे...आणि २०१२ मध्ये सईनं नो एंट्री पुढे धोका आहे चित्रपटात बिकिनी शॉट देऊन खळबळ माजवली होती. यावरून तिच्यावर टीकाही झाली आणि धाडसाचं त्यावेळी कौतुकही झालं.
यानंतर सईचं लग्न हा देखील चर्चेचा विषय झाला.
सई ताम्हणकर आणि हिने तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अमेय गोसावी यांच्यासोबत १५ डिसेंबर २०१३ ला लग्न केलं. अमेय हा एक प्रोड्युसर आहे. अमेय तिला तिच्या प्रोफेशनमध्ये प्रचंड सर्पोट करत असल्याचे सईने मुलाखतीत सांगितले होते. तिच्या लग्नानंतरच तिने 'हंटर' या सिनेमांत काम केलं होतं. आणि या सिनेमातील तिचा बोल्ड लूक चर्चेत आला होता. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असाच तिच्या फॅन्सचा समज होता. पण लग्नाच्या दोन वर्षातच सईनं घटस्फोट घेतल्याची बातमी दिली. यानंतर सईनं वेगवेगळ्या चित्रपटांमधून एकापेक्षा एक भूमिका वठवत आयएमडीबीच्या १० सर्वोत्कृष्ट ब्रेकआउट स्टार्स यादीत नावं झळकावलं आणि आता सई पुन्हा चर्चेत आली तिच्या नव्या पोस्टमुळे... सई आता पुन्हा प्रेमात पडलीये असं दिसतंय.सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर ग्लो येतो. या कॅप्शनसोबत तिने हॅशटॅगमध्ये वन, साहेब, दौलतराव मेंशन केले आहेत. आता तिने शेअर केलेल्या व्यक्तीचं नाव अनीश जोग आहे. अनीश जोग हा ही सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. तो सिनेनिर्माता असून त्याने आणि काय हवं? वेबसीरिज, गर्लफ्रेंड, मुरांबा, वायझेड, डबल सीट, टाईम प्लीज आणि धुरळा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी अनिश जोगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सईचा आणि त्याचा फोटो शेअर केला होता आणि त्यावर मॅजिक तू आणि मी असे कॅप्शन दिले होते. त्या पोस्टवर सेलिब्रेटींनी खूप कमेंट्स केल्या आहेत. या कमेंटवरून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे समजते. मात्र आता सई ताम्हणकर आणि अनीश जोग कधी त्यांचे नाते जगजाहीर करतात याची उत्सुकता आहे.

Category
🗞
News