मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विश्वासू, कट्टर मनसैनिकाला पदावरुन दूर सारलं. वसंत मोरे यांची पुणे शहराच्या शहराध्यक्षपदावरुन दूर सारत त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पदावरुन दूर सारल्यानंतर वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. पण या सगळ्या चर्चांना हवा लागण्याआधी आणि त्याचं वादळात रुपांतर होण्याआधी आधी वसंत मोरे प्रसारमाध्यमांसमोर आले.
Category
🗞
News