पुणे शहरातील धनकवडी भागामध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजी नगर मधून वरात काढली. परिसरातील नागरिकांवरची भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी आरोपींना पोलिसांनी त्याच परिसरातून फिरवले .रविवारी सोशल मीडियावर गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते, त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून आज त्यांची धनकवडी भागातील बालाजीनगर येथून वरात काढलेली आहे. यापूर्वी आरोपीना आठ एप्रिल पर्यंत आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे.
Category
🗞
News