पुणे सोलापूर मार्गावरील वाशिंबे ते भिगवण दरम्यान रेल्वेमार्गावरील नवीन दुहेरीकरण झालेल्या लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम चालू आहे. काल सायंकाळी पारेवाडी स्टेशनकाजवळ असलेल्या उजनी जलाशयावरील हिंगणी रेल्वे पूलावर या कामाचे रेल्वे इंजिन घसरून अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रेल्वे इंजिनचे मात्र थोडे नुकसान झाले आहे. काल रेल्वे इंजिन अजून दहा फूट पुढे आले असते तर उजनीच्या पाण्यात कोसळले असते. सध्या पूर्वीप्रमाणे असणारी एकेरी मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
Category
🗞
News