• 2 years ago
उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या घुसल्याची घटना घडली. आवारी यांच्या घरी चार जण झोपले होते. भगवान यांची आई सिंधुबाईंना जाग आली असता खाटे खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. मात्र त्याच वेळेस भगवान यांच्या पत्नीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करत कसाबसा स्वत:चा जीव वाचवत त्या घराबाहेर पडल्या. त्यानंतर तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली.वनविभागालाही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

Category

🗞
News

Recommended