• 2 years ago
कोपरगावमध्ये कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळयात हे वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
कार्यक्रमस्थळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं भाषण सुरु होतं. तितक्यात खासदार सुजय विखे पाटील आपल्या खुर्चीवरुन उठून दोन चारखुर्च्यांपलीकडे बसलेल्या अजित पवार यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. अजित पवार शेजारी बसलेल्या नेत्याशी कानगोष्टी करत होते. सुजय विखे आपल्याशी बोलण्यासाठी आलेत, हे पाहून अजित पवार यांना सुजयकडे कटाक्ष टाकला. मग जवळपास २० ते २५ सेकंद सुजय विखे-अजित पवार यांच्यात कानगोष्टी सुरु होत्या. सुजय विखे त्यांना कसलीशी विनंती करत होते. मात्र अजित पवार यांनी नको नको म्हणत होते. दरम्यानच्या ३० सेकंदात अजितदादांनी त्यांना ४ वेळा हात जोडले. पण दोघांमध्ये नेमकं काय बोलणं सुरु होतं, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Category

🗞
News

Recommended