संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा संजय राऊत यांनी राज्यसभेत केला आहे.संजय राऊत राज्यसभेत बोलताना म्हणाले की, "संविधानात म्हटलंय की कुणालाही त्याच्या इच्छेविरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही कलम २० च्या नुसार प्रत्येक नागरिकाला गप्प बसण्याचा आधिकार आहे,कोणालाही त्याच्या इच्छेविरोधात साक्ष देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही नार्को ब्रेम मॅपिंग अशा इतर कोणत्याही सायंटीफिक टेस्ट केली जाऊ शकत नाही यामुळे २०१० मध्ये सुप्रिम कोर्टाने नार्को टेस्टला देखील बेकयदेशीर म्हटले'ते पुढे म्हणाला की, "मी गृहमंत्र्यांचा आभारी आहे. कायद्याचा गैरवापर होणार नाही असे गृहमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं होतं, पण तुम्ही डोळ्यात डोळे घालून म्हणू शकाता का की कायद्याचा गैरवापर होत नाहीये." असा सवाल देखील त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे.
Category
🗞
News