दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भावामुळे सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. पण हा त्रास फक्त ग्राहकांना नाही तर पेट्रोलपंपवाल्यांनाही याचा फटका बसतोय. कारण पेट्रोल , डिझेलचे दर वाढल्यामुळे काहीजण 20 किंवा 30 रुपयांचे पेट्रोल टाकतात. परिणामी पेट्रोलपंपाच्या वीजबिलात भरमसाठ वाढ होते. त्यामुळे यावर तोडगा म्हणून आता नागपूरकरांनी एक नियम बनवला आहे. ५० रुपयांच्या खाली पेट्रोल मिळणार नसल्याचा बोर्डच पंपावर लावण्यात आला आहे. पण यामुळे पेट्रोलसाठी आता ग्राहकांना 50 रुपये तरी मोजावेच लागणार एवढ नक्की.
Category
🗞
News