राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाशिम बायपास येथे. असलेल्या गॅरेजला आज सकाळच्या प्रहरी आग लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ऑइल आणि टायर व इतर साहित्य पूर्णपणे जळाले आहे. अजूनपर्यंत ही आग नेमकी लागली कशामुळे हे समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा बंबांनी प्रयत्न केले. आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
Category
🗞
News