राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिका-यांने राजीनामा दिला. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लीम समाज नाराज झाला आहे. शाखा अध्यक्ष मजीद शेख यांनी विभाग अध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडे राजीनामे सोपवला आहे. येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लीम पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरेंच्या भाषणानंतर हा राज्यातील पहिलाच राजीनामा असल्याने खळबळ उडाली आहे.
Category
🗞
News