IPL मध्ये CSK ची वाट लावणारा वैभव अरोरा कोण आहे?

  • 2 years ago
रविवारी झालेल्या लढतीत चेन्नईला सलग तिसऱ्यांदा पराभाव झाला. पंजाब किंग्सकडून डेब्यु करणाऱ्या वैभव अरोराने लक्षवेधी कामगिरी केली. वैभव अरोर हा आधी पंजाब किंग्सचा नेट बॉलर होता. आणि आज त्याच संघातून त्याला खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये स्वप्न साकार करणारा वैभव अरोर आहे तरी कोण जाणून घेऊयात व्हिडिओमधून...  
14 डिसेंबर 1997 रोजी वैभवचा जन्म झाला. वैभव मुळचा अंबालाचा आहे. क्रिकेट खेळण्यासाठी तो चंदीगडला आला. त्याने क्रिकेटसाठी हिमाचल प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला. हिमाचलच्या संघाकडून त्याने रणजी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 2017 मध्ये त्याला एक दुखापत झाली होती. त्यातून बरं होताच 2019-20 मध्ये त्याने हिमाचल प्रदेशकडून प्रथम श्रेणीमध्ये त्याने कमबॅक केलं. 2021 मध्ये सैयद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत तो पहिला सामना खेळला. आणि तिथेच त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे अनेकांची नजर त्याच्याकडे वळली. सहा सामन्यात 10 विकेट घेऊन त्याने आपल्या टीमला क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवले. यावेळी वैभवला विकत घेण्यासाठी कोतकाता नाईट्स राईडर्स आणि पंजाब किंग्स मध्ये चुरस दिसली. पंजाबने तब्बल २ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. २० लाख रुपयांची बेस प्राईज असलेल्या वैभवला १० पट अधिक रक्कम मिळाली. अखेर पंजाबने मारलेल्या बाजीचं फळ त्यांना आता मिळतयं.