अभिनेता जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग स्टारर 'अॅटॅक' हा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला. सिनेमाची स्टारकास्ट विविध प्लॅटफॉर्म्सवर 'अॅटॅक'चे जोरदार प्रमोशन करताना दिसतेय.या मुव्हीतील अभिनेत्री जॅकलिन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.या व्हिडीओत जॅकलिन आर्चीचा डायलॉग म्हणताना दिसतेय . 'मराठीतून सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू का?' व्हिडीओमध्ये जॅकलिन हा डायलॉग म्हणताना दिसतेय.जॅकलिनचा हा 'मराठी स्पेशल' व्हिडीओ Focusindian अर्थात करण सोनावणे या कंटेट क्रिएटरने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर केला.
Category
🗞
News