पाकिस्तान, इंडोनेशिया, सौदी यांसारखे अनेक देश मुस्लीम बहुसंख्य आहेत, मग त्या देशात मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास होत नाही का, बहुसंख्यंक मुस्लीम देशात मशिदीच्या भोंग्यांसाठी काय नियम आहेत, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनी काय निमय बनवलेत हे सविस्तर समजून घेणार आहोत. मी कोमल. भारतात मशिदीवर अजानसाठी लावलेल्या भोंग्यावरुन पेटणारं राजकारण नवीन नाही. सोनू निगमने जेव्हा मी मुस्लीम नसतानाही अजानमुळे माझी झोपमोड का होतेय, असा सवाल केला तेव्हाही राजकारण पेटलं होतं. आता राज ठाकरेंनी भोंगे हटवण्याची मागणी केल्यानंतरही राजकारण जोरात सुरुय.. त्यामुळे भारतात हे सुरू असताना जगात याबाबत काय सुरुय तेही पाहणं गरजेचंय..
Category
🗞
News