मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली .मुंबई नंतर आता नाशकातही भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यात आली. नाशकातील भद्रकाली परिसरात मनसेने भोंगे लावले.राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात इतरत्रही भोंगे लावण्याचं पदाधिकाऱ्यांचे नियोजन आहे.दरम्यान मनसेच्या या भूमिकेवर मंदिराच्या पुजाऱ्यांनीही मत व्यक्त केलंआहे.
Category
🗞
News