आज काल तरुणांना लगीन घाई महागात पडतेय. कारण लग्न करायच म्हटलं तरी नवरदेवाला आपल्यावर संक्रात .य़ेणार नाही ना याची काळजी घ्यावी लागणार आहे बहुतेक.. कारण नवरदेवाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या घटना वाढतच चालल्यात.. असचा एक धक्कादायक प्रकार घडला जालन्यात. बिचाऱ्या नवरदेवावर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डोक्याला हात लावण्याची वेळ आली.. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशन हद्दीमधील शेलुद येथील शेतकरी परिवारामधील युवकाचा दोन दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील नववधु सोबत गावातील एका मंदिरात विवाह झाला. .दिवसभर सगळा परिवार लग्नाच्या धामधुमीत असताना लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू रात्रीच्या वेळी रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने असे जवळपास 3 लाखांचा मुद्देमाल घेऊन रफुचक्कर झाली. घडलेल्या या घटनेने काकडे कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला. नवरी आणि तिच्या सोबत असलेल्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा घटनांमुळे लग्न करताना वधु काय आणि वर काय दोन्हीही बाजुची चौकशी होण तेवढीच गरजेची आहे. पण अशा फसवणूकीच्या घटनांमुळे लग्नासारख्या सुखद क्षणाला गालबोट लागतय हे नक्की.
Category
🗞
News