राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला" अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
Category
🗞
News