मुंबईतील पश्चिम उपनगरासाठी आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रवास करत मुंबईतकांच्या सेवेत ही मेट्रो सेवा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मेट्रो ७ मार्गावर आरे ते कुरार असा प्रवास केला. आज मेट्रोच्या २ ए आणि मेट्रो ७ या मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य सरकारच मुंबईकरांना हे गिफ्ट असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
Category
🗞
News