मोदी है तो मुमकीन हैं; एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भाजपचं राज्यसभेतही शतक

  • 2 years ago
राजकारणात असे काही किस्से असतात, जे ऐकल्यानंतर काही काळासाठी का होईना भूतकाळात जाऊन विचारा करावा लागतो. अशीच एक घटना सध्या भूतकाळात डोकावून पाहायला लावणारी ठरतेय. देशाच्या राजकारणात मोदींनी प्रत्येक वेळी जे चित्र पालटलंय, त्याची प्रचिती वेळोवेळी आलीय. पण आता संसदेतील वरच्या सभागृहात म्हणजे राज्यसभेत भाजपने जी कमाल केलीय, ती काँग्रेसला विचार करायला लावणारी आहे. ईशान्य भारतातील ३ जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या पहिल्यांदाच १०० झालीय. १९८८ नंतर भाजप हा पहिलाच राजकीय पक्ष ठरलाय, ज्यांच्या सदस्यांची संख्या राज्यसभेत १०० झाली. याआधी ३३ वर्षांपूर्वी २४५ सदस्य असलेल्या या सभागृहात काँग्रेसचे १०० पेक्षा जास्त खासदार होते. यावेळी भाजपने मिळवलेल्या विजयात काँग्रेसला बसलेला मोठा धक्का बसला तो ईशान्य भारतात. इथे राज्यसभेवर काँग्रेसचा एकही सदस्य नाही. ईशान्य भारतातील राज्यांतून राज्यसभेवर एकूण १४ जागा आहेत. त्यापैकी १३ जागा भाजपकडे आहेत. तर आसाममधील एक जागा अपक्ष उमेदवार अजित कुमार भुयान यांच्याकडे आहे.

Recommended