मुंबईतली गरमी आणि त्यात लोकल ट्रेनचा प्रवास म्हणजे कसं घामाघूम व्हावं लागतं हे रोज प्रवास करणाऱ्यांनाच माहितीय. तुमच्या समोर असलेली दृष्य मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची आहेत, ज्यात एका बाजूला रिकामीच एसी लोकल उभीय, ज्याकडे कुणी डुंकूनही पाहायला तयार नाही. तर दुसरीकडे साधी एसी लोकल आहे, ज्यात चढण्यासाठी प्रवाशांची तुफान गर्दी झालेली दिसतेय. मुंबईत एसी लोकल रिकाम्याच धावतायेत, तर साध्या लोकलमध्ये सकाळच्या वेळी चढायलाही जागा मिळत नाही. कडक उन्हाळा, त्यात ट्रेनमधली गर्दी यातून काहीसा दिलासा मिळण्याचा मार्ग म्हणजे एसी लोकल आहे. पण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे या एसी लोकल अजूनही रिकाम्याच धावतात.
Category
🗞
News