बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार लढतात, बारामती लोकसभा मतदारसंघातून सप्रिया सुळे निवडणूक लढतात. त्यामुळे पवारांच्या पुढच्या पिढीला राजकारणात उतरायचं तर नवा मतदारसंघ शोधावा लागतो. रोहित पवारांनी थेट कर्जत जामखेड मतदारसंघ गाठत राजकारणात पाय रुजवला, तर अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळमधून नशिब आजमावलं. पण तिथे काही त्यांचा निभाव लागला नाही. आता पार्थ पवार नव्या मतदारसंघाच्या शोधात असल्याचं दिसतंय. पण पार्थ पवार ज्या मतदारसंघात जाणार, तिथल्या स्थानिक आमदाराचं काय होणार, राष्ट्रवादी स्थानिकांना डावलून कुटुंबातल्या सदस्यालाच तिकीट देणार का आणि पार्थ पवार खरंच नव्या इनिंगला सुरूवात करत आहेत का हे सविस्तर या व्हिडीओतून पाहू..
Category
🗞
News