मुंबईत सर्वत्र गुढीपाडवा उत्सव साजरा होत आहे. शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, बुलेट रॅली, भजन, कीर्तन, अभंग या सर्व कार्यक्रमांचे ठिक-ठिकाणी आयोजन केले आहे. मात्र मुलुंड पूर्वेकडे एक अनोखा असा गुढीपाडवा उत्सव साजरा करताना पाहायला मिळाला. मुलुंड पूर्वेकडील वीर संभाजी मैदान येथे मी मुलुंड प्रतिष्ठान कडून भव्य अशी रांगोळी काढत मुलुंडकरांची नववर्षाची सुरुवात शुभ करण्यात आली आहे. वीर संभाजी मैदान येथून या कलाकृतीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी....
Category
🗞
News