नाशिकमधील सातपूर येथे निगळ गल्लीत असलेल्या एका पडक्या शाळेत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे, हे अर्भक चार दिवसांचं असल्याचं म्हटलं जात. चार दिवसांच्या नवजात बाळाला एका प्लास्टिकच्या डब्यात घालून कचर्याच्या ढिगाऱ्यत फेकून दिल्याची घटना खरोखरच धक्कादायक आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण काळे यांनी ही घटना सर्वांसमोर उघडकीस आणली. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा संशय असून गुन्हा दाखल करण्याचीच मागणी होऊ लागली आहे. पण या घटनेमुळे सर्वांना जसा धक्का बसला तशी सर्वांनी हळहळही व्यक्त केली आहे.
Category
🗞
News