रशियाने स्वस्तात कच्च तेल देण्याची ऑफर दिली, नंतर स्टील बनवण्यासाठीचा कोळसाही कमी किंमतीत देण्यासाठी भारताने करार केला, पण त्यानंतर रशियाने एक नवं संकट उभं केलंय आणि भारतासाठी इकडे आड, तिकडे विहिर अशी ही परिस्थिती आहे. कारण, रशियाने भारताकडे थकीत १० हजार कोटी रुपयांची मागणी केलीय. भारतासाठी ही रक्कम देणं ही समस्या नाही, तर हे पेमेंट करण्यासाठी चीनची मदत घ्यावी अशी रशियाची इच्छा आहे आणि हीच भारताची सर्वात मोठी अडचण आहे. युद्ध काळातही मैत्री निभावणाऱ्या भारताला रशिया चीनवर अवलंबून राहण्यासाठी भाग पाडत आहे का, भारताची रशिया आणि चीन या दोन देशांच्या मध्ये गोची होतीय का आणि मोदी सरकारकडे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पर्याय काय आहेत सविस्तर या व्हिडीओत पाहू..
Category
🗞
News