• 3 years ago
ग्रामपंचायतीच्या सभेत दारुच्या नशेत खुर्चीवर लोळण ग्रामसेवकास चांगलच महागात पडलं.दारुडया ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटिस बजावरण्यात आली आहे.भंडारा जिल्ह्यातील साकोलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत विरशी येथे सोमवारी सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होत. या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक हेमंत पब्बेवार चक्क दारू पिऊन आले होते. ते दारुच्या नशेत इतके तर्र होते की खुर्चीवर बसल्याबसल्या लोळू लागले. ग्राम पंचायतीच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु, ते उठूही शकत नव्हते. परिणामी, पदाधिकाऱ्यांची सभा रद्द करावी लागली. आता यांची तक्रार वरिष्ठाकड़े झाली असून खंडविकास अधिकारी यांनी संबधित ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटिस जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो वायरल झाले होते. तर गावकऱ्यांनी ग्रामसेवकाचीतक्रार खंड विकास अधिकारी यांच्याकडे केल्यावर आता संबधित दारुडया ग्रामसेवकाला कारने दाखवा नोटिस बजावरण्यात आली आहे. दारूडया ग्रामसेवका विरोधात विरसी वासियानी दंड ठोठावला असून जो पर्यंत दारूडया ग्रामसेवकाची गावातून बदली होत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय न उघडण्याचा निंर्णय घेण्यात आल्याच म्हटलं जातय.

Category

🗞
News

Recommended