राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दोन दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर केला. या दौऱ्यात त्यांनी नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघात सभा घेतली. आदीत्य ठाकरेंच्या या दौऱ्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्ही आमच्या काळात केलेल्या विकासकामांची उद्घाटन या सरकारच्या मंत्र्यांनी केली आहेत. सेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवयच आहे. आदित्य ठाकरे यांनी कोकणाच्या विकासासंदर्भात कामे करावीत. फिरून टोमने मारयचे असतील तर दौरे कशाला करता? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
Category
🗞
News