देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आज सर्वात मोठी सल कशाची असेल तर त्यांनी जाहीर केलेल्या एका अशा प्रकल्पाचं उद्घाटन लवकरच होतंय, जो प्रकल्प महाराष्ट्रात नव्हे, देशाच्या वैभवात भर घालणार आहे आणि याचं लोकार्पण करताना फडणवीस स्वतः मुख्यमंत्री पदावर नाहीत. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणारा समृद्धी हा फक्त एक मार्ग नाही, तर या महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक असं वैभव तयार होतंय, जे सध्या कुठेही नाही... याची किंमत आहे तब्बल ४६ हजार कोटी रुपये. दोन शहरांना एकत्र आणणारा हा महामार्ग मराठवाड्याच्या राजधानीलाही जोडला गेलाय.
Category
🗞
News