• 2 years ago
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा दावा आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचं उघड झालं.भाजपचे 20 ते 25 कार्यकर्ते केजरीवाल यांच्या घराच्या गेटवर आल्याचं दिसून येत आहेत.काही कार्यकर्त्यांच्या कपाळाला भगवी पट्टी बांधलेली दिसत आहेत. सर्व कार्यकर्ते तरुण असून हे कार्यकर्ते केजरीवाल यांच्या घराचा गेट उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Category

🗞
News

Recommended