दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला होता. मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी करत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काय खरं आणि काय खोटं हे सांगणयासाठी न्याय व्यवस्थता आणि यंत्रणा आहे. माझ्या विरोधात गुन्हा दाखल करणारे धनंजय शिंदे, भाई जगताप आणि नाना पटोले यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे.
Category
🗞
News