भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत सभेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत खुर्चीवरच लोळत पडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ऐन सभेतच ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध होऊन पडल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही. हेमंत पब्बेवार असं या ग्रामसेवकाचं नाव असून दारुच्या नशेत इतके तर्र होते की खुर्चीवर बसल्याबसल्या लोळू लागले.ग्रामपंचायतीच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु, ते उठूही शकत नव्हते. परिणामी, पदाधिकाऱ्यांची सभा रद्द करावी लागली,ग्रामसेवकाची तक्रार स्थानिक पोलिस आणि वरिष्ठांकडे संबंधित ग्रामसेवकाची तक्रार करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो वायरल झाले आहेत.
Category
🗞
News