इलेक्ट्रीक कारच्या सोबतीला आता ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार आली आहे. टोयाटोने ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर चालणारी भारतातील पहिली वहिली कार आणली.आज संसदेत जाताना गडकरींनी याच कारने प्रवास केला. प्रदूषण नियंत्रणासाठी हायड्रोजन इंधन वापराच्या पर्यायाची पडताळणी करण्यासाठी गडकरींनी हा प्रवास केला.महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल, असा दावा गडकरींनी यावेळी केला.
Category
🗞
News