• 2 years ago
जळगावात चक्क शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या नवीपेठ परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून १५ ते २० लाखांचा ऐवज लांबविल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. लोखंडी खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड लंपास केली आहे. नवीपेठ परिसरात राहणारे राजू गोविंद अग्रवाल हे मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे. अग्रवाल कुटुंब घरात नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी लोखंडी खिडकीचे गज वाकवून काचेची खिडकी फोडत घरात प्रवेश केला आणि मंगळसूत्र, नेकलेस, मोतीहार, बारा कानातले, सोन्याचे तुकडे, २ अंगठी, ३ सोन्याचे शिक्के, चैन असा जवळपास २५ ते ३० तोळे दागिने आणि देव्हाऱ्यात ठेवलेले ८ हजार रुनपये रोख व घरात दुरुस्तीसाठी ठेवलेले ग्राहकांचे ८ मोबाईल असा १५ ते २० लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय.पोलिसांत याबाबत तक्रार दिली असता पोलिस पुढील तपास करत आहे.

Category

🗞
News

Recommended