Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/30/2022
प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून रत्नागिरीतील राजापूर येथील नागरिक रस्त्यावर उतरले. रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला. नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे. राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानुसार नाणारला बारसूचा पर्याय देण्यात येणार आहे. रिफायनरीसाठी जवळपास तेरा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे. याविरोधात स्थानिक नागरिकांनी विरोध करत एल्गार केल्याचं पाहायला मिळालं.

Category

🗞
News

Recommended