राज्यातील निर्बंध हळहळू शिथील केले जातील. रेल्वे, बस, मॉलमधील शिथीलकरणाबाबत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. परदेशात कोरोनाचा धोका वाढतोय, ज्या नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांनी घ्यावी, लसीकरणांच लक्ष्य गाठल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले. १ एप्रिलपासून राज्यातील निर्बंध हटणार मात्र मास्क सक्ती अनिवार्य असेल असं ते यावेळी म्हणाले. गुडीपाडवा आणि सण उत्सवावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापर्यंत चर्चा करुन निर्णय घेतील असं ते यावेळी म्हणाले.
Category
🗞
News